निमित्त : नो नेशन फॉर विमेन
विद्या आपटे
०४ जानेवारी २०२१
’नो नेशन फॉर विमेन’ हे प्रियांका दुबे या पत्रकार महिलेचं भारतातल्या काही बलात्काराच्या घटनांचा तपशीलात मागोवा घेणारं पुस्तक वाचनात आलं आणि माझी झोप उडाली. वृत्तपत्रातून, दृकश्राव्य माध्यमातून बलात्काराच्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येणं ही नित्याची गोष्ट झाली आहे. घटना सत्य असते पण तिचे सर्व घटक – म्हणजे नेमकं काय घडलं, कशा परिस्थितीत, कोणत्या वातावरणात घडलं, शेजारी, गावकरी, गावातली वजन…